Latur Earthquake
esakal
१९९३ मधील महाभूकंपानंतर लातूर जिल्ह्यात वारंवार सौम्य धक्के बसले आहेत.
गेल्या ३२ वर्षांत एकूण ८९ सौम्य धक्क्यांची नोंद करण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण असून, दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.
-सुशांत शोभा सांगवे
लातूर : किल्लारी व परिसरात झालेल्या महाप्रलयकारी भूकंपानंतर (Killari Earthquake Memorial Day) लातूरकरांनी (Latur Earthquake) गेल्या ३२ वर्षांत हादरवून सोडणाऱ्या भूकपांचा वारंवार अनुभव घेतला आहे. आजवर भूकंपाचे ८९ सौम्य धक्के लातूरकरांनी अनुभवले आहेत. त्यामुळे येथील नागरिक कायम भीतीच्या सावटाखाली आहेत. येथे वारंवार होणाऱ्या भूकपांच्या घटनांचा अभ्यास करून लातूर जिल्ह्यात दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.