
Dharur Police Return Lost Purse with Cash and Gold to Woman Amidst Diwali Rush.
Sakal
किल्लेधारूर : धारूर बसस्थानक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. (ता.२३) रोजी एका महिलेची पर्स हरवण्याची घटना घडली होती. या पर्समध्ये चार हजार रुपये, एक ग्रॅम सोन्याचा बदाम, आधारकार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे होती. पोलिसांच्या तत्परतेमुळे ही पर्स शोधून संबंधित महिलेला परत मिळाली.