Farm Murder Case in Parbhani : सामायिक बांधावरून पेटला वाद, शेतातच घडला थरकापजनक खून; दोन तासांत आरोपी जेरबंद!
Rural Land Murder Case in Parbhani : परतूर तालुक्यातील वाढोणा शिवारात शेताच्या वादातून तरुणाची दगडाने मारहाण करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोघा आरोपींना अटक केली.
परतूर : वाढोणा (ता. परतूर) शिवारात घडलेल्या खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना दोन तासांत अटक करण्यात परतूर पोलिसांना यश आले आहे. वाढोणा शिवारातील शेतात रविवारी (ता.२९) सायंकाळी ही घटना घडली होती.