Nurlibai Badri Devare
Nurlibai Badri Devaresakal

Devgaon Rangari Crime : पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालुन निर्घुणपणे हत्या; पती पोलीसांच्या ताब्यात

तीन दिवसांपूर्वी शेती कामासाठी आलेल्या मध्यप्रदेशातील शेतमजुर असलेल्या पती-पत्नी वादावादीतुन संतप्त पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालुन निर्घुणपणे हत्या केल्याची घटना घडली.
Published on

देवगाव रंगारी - देवगांव रंगारी पोलिस ठाणे हद्दीतील मौजे रोहिला खुर्द येथील शेतवस्तीवर तीन दिवसांपूर्वी शेती कामासाठी आलेल्या मध्यप्रदेशातील शेतमजुर असलेल्या पती-पत्नी वादावादीतुन संतप्त पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालुन निर्घुणपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) पहाटे तीन वाजेच्या सुमारास रोहिला येथील शेती गट नं. १३९ मधील शेत वस्तीवर येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. मृत महिलेचे नांव नुरलीबाई बद्री देवरे (वय-२४) असे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com