Girl allegedly taken away on promise of marriage in Kinwat
ईस्लापूर : किनवट तालुक्यातील तल्हारी येथे २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून घरातून बाहेर बोलावून ऑटोमधून घेऊन गेल्याची तक्रार इस्लापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी एका २७ वर्षीय युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(२), ८७ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.