Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरारी कृष्णा आंधळेसाठी न्यायालयात वॉरंटची मागणी; सरकारी पक्षाचा ठोस पवित्रा
Krishna Andhale: केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली असून पुढील तारीख १८ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. फरारी आरोपी कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी वॉरंटची मागणी सरकारी पक्षाने केली आहे.
बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या, अवादा कंपनीकडे खंडणीची मागणी, अॅट्रॉसिटी या प्रकरणांत सोमवारी (ता. चार) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी १८ ऑगस्टला होणार आहे.