namdeo maharaj shashtri and krishna maharaj shashtri
sakal
शिरूरकासार, जि. बीड - श्री क्षेत्र भगवानगडाच्या स्थापनेच्या अमृतमहोत्सवी वर्षात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार (ता. २०) रोजी कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे चतुर्थ महंत म्हणून गादीवर विराजमान होणार आहेत. विद्यमान मठाधिपती न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते धार्मिक विधींनुसार गादी हस्तांतरण होणार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हा सोहळा भव्य स्वरूपात न करता साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.