
मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रासाठी विशेष जीआर काढला. या जीआरनुसार, हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ज्यांच्या नोंदी उपलब्ध नाहीत, त्यांना रक्ताच्या नात्यातील नातेवाईकाच्या प्रतिज्ञापत्र मिळू शकते.
मनोज जरांगे यांनी दावा केला की, यामुळे मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात स्थान मिळेल. पण, हे प्रमाणपत्र मिळवणे इतके सोपे नाही. यासाठी तब्बल १५ ते १६ कागदपत्रे सादर करावी लागतात, जे मिळवणे हे एक मोठे आव्हान आहे.