

Kunbi Certificate Row: Beed Administration Rejects Jarange’s Claim
Esakal
Kunbi Caste Certificate: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बावनकुळेंच्या आदेशानं कुणबी प्रमाणपत्र जप्त केल्याचं जरांगे पाटील म्हणाले होते. आता याबाबत प्रशासनानं स्पष्टीकरण देत महसूल मंत्री बावनकुळेंच्या सूचनेवरून एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं नसल्याचं बीड जिल्हा प्रशासनाने म्हटलंय. जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही असंही प्रशासनाने स्पष्ट केलं. उपजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल महसूल मंत्र्यांच्या कार्यालयाकडे सोपवला आहे.