कुंटूर पोलिसांनी २६ टन तांदूळ पकडला 

फोटो
फोटो

नांदेड : तेलंगनातील संगारेड्डी येथून शासकिय वितरणचा तांदूळ कृष्णूर येथील पंचतारांकीत औद्योगीक वसाहतीत असलेल्या एका धान्य कंपनीत विक्रीसाठी आलेल्या ट्रकला कुंटुर पोलिसांनी शुक्रवारी (ता. १०) रात्री जप्त केले. ट्रकची तपासणी केली असता त्यात २६ टन तांदूळ आढळून आला. पोलिसांनी ट्रकसह तांदूळ आणि चालकास ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी नायगाव तहसिल कार्यालयाला कळविले आहे. 

कुंटुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण हे आपले सहकारी हवालदार जी. आर. पांचाळ, सदाशिव पाटील यांनी शुक्रवारी (ता. १०) रात्रीच्या एक वाजताच्या दरम्यान गस्त घालत होते.  श्री. पठाण यांना त्यांच्या गुप्त माहितीगाराने दिलेल्या माहितीवरून कृष्णूर एमआयडीसी परिसरात सापळा लावला. तेलंगनातील येणाऱ्या सर्व मालवाहू ट्रकची तपासणी सुरू केली.

ट्रकसह दोघांना घेतले ताब्यात 

यावरून त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आलेला ट्रक  (एम.एच-३८- डी ४४४४) तपासणीसाठी थांबविला. चालकास ताब्यात घेऊन ट्रकची तपासणी करून आतमधील मालाची रॉयल्टी मागितली. यावेळी ट्रक चालकाकडे याबाबतची कुठलीच कागदपत्रे नव्हती. ट्रकमध्ये काय आहे याची तपासणी केली असता त्यात रेशनचा तांदूळ असल्याचे उघड झाले. हा ट्रक संगारेड्डी (तेलंगना) येथून कुष्णूर एसआयडीसीकडे जात होता.  ट्रक चालक इरफान खाँन सिकंदर खाँन (वय २४) व त्याचा सहकारी शेख निसार शेख नजीर हे दोघे राहणार देगलूर नाका, टायर बोर्ड, नांदेड यांना ताब्यात घेऊन जप्त केलेला ट्रक कुंटुर पोलिस ठाण्यात लावला. 

मेगा धान्य घोटाळा ताजा असतानाच ही कारवाई

कृष्णूर एमआयडीसीतील मेगा धान्य घोटाळा हा राज्यभर गाजला असून आजूनही त्यातील आठ जण हर्सुल कारागृहात शासकिय पाहूणचार घेत आहेत. तेलंगनातील हा एवढा मोठा तांदूळ कोणत्या कारखाण्यात व कशासाठी आला होता हे तपासअंती समोर येणार आहे. 

नायगाव तहसिल कार्यालयाची उदासीनता

या प्रकरणी जप्त केलेल्या शासकिय वितरणाच्या मालाबद्दल नायगाव तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाला तसे पत्र देऊन कळविले आहे. मात्र दुसरा शनिवार व आज रविवार हा सुटीचा दिवस असल्याने एकही अधिकारी कुंटुर पोलिस ठाण्यात पोचला नाही. जोपर्यंत तहसिल कार्यालयाचे अधिकारी किंवा कर्मचारी येणार नाहीत तोपर्यंत पुढे काय कारवाई करायची हे त्यांच्यावर अवलंबुन आहे. मात्र सध्यातरी तांदूळ व ट्रक आणि त्याचा चालक आमच्या ताब्यात असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांनी सांगितले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com