वसमत - वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील भाविकाचा सोनप्रयाग येथे बुधवारी ता. २ सकाळी ऱ्हदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कुरुंदा गावावर शोककळा पसरली असून त्यांचा मृतदेह रुद्रप्रयाग मार्गे कुरुंदा येथे आणला जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिल्या आहेत.