esakal | वित्तीय कंपनीच्या कर्मचाऱ्याची बॅग पळवून लाख रुपये लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

चित्र

बचतगटांस दिलेल्या कर्जाची वसुली करून कर्मचारी दुचाकीने कार्यालयाकडे जात असताना अज्ञात चोरट्यांनी बॅग हिसकावून घेत सुमारे लाख रुपयांची चोरी करून पोबारा केला. ही घटना बुधवारी (ता.चार) सायंकाळी पाचच्या सुमारास जडगाव-टोणगाव या जोडरस्त्यावर घडली.

वित्तीय कंपनीच्या कर्मचाऱ्याची बॅग पळवून लाख रुपये लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

करमाड (जि.औरंगाबाद) : बचतगटांस दिलेल्या कर्जाची वसुली करून कर्मचारी दुचाकीने कार्यालयाकडे जात असताना अज्ञात चोरट्यांनी बॅग हिसकावून घेत सुमारे लाख रुपयांची चोरी करून पोबारा केला. ही घटना बुधवारी (ता.चार) सायंकाळी पाचच्या सुमारास जडगाव-टोणगाव या जोडरस्त्यावर घडली.


या घटनेत या कर्मचाऱ्याकडील बॅगेतील 80 हजार 844 रुपये इतकी रोख रक्कम, दहा हजार 200 रुपयांचा टॅब व तीन हजार 500 रुपयांचे बायोमेट्रिक स्कॅनर असा 94 हजार 544 रुपयांचा ऐवज चोरीस गेला. याबाबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सुनील सुभाष खरात (वय 28, रा. औरंगाबाद) यांनी करमाड पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार ते भारत फायनान्शियल इन्क्‍लुजन लिमिटेड' या खासगी कर्जवाटप करणाऱ्या कंपनीचे वसुली कर्मचारी आहेत. दर महिन्यात ते औरंगाबाद तालुक्‍यातील महिला बचतगटांना त्यांच्या कंपनीमार्फत वाटप केलेल्या कर्ज परतफेडीचे हप्ते वसुली करतात.

त्यानुसार ते बुधवारी (ता.चार) एकलहरा, टोणगाव व जडगाव या गावांतील बचतगटांकडील कर्ज हप्त्याची रक्कम घेऊन जडगाव-टोणगाव या जोडरस्तामार्गे जालना रस्त्याला लागून कार्यालयाकडे दुचाकीने (एमएच-28, एव्ही-8985) निघाले होते. दरम्यान, दोन अज्ञात चोरट्यांनी वळण रस्त्यावर दूरवर कुणी नसल्याचा फायदा घेत त्यांची दुचाकी कमी वेगात असताना त्यांना ढकलून देऊन त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेत पळ काढला.


दरम्यान, खरात यांनी करमाड पोलिस ठाणे गाठून ही तक्रार दिली. यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मागील महिन्यातच चिकलठाणा पोलिस ठाणे हद्दीतील चित्तेपिंपळगाव-पिंप्रीराजा रस्त्यावरही खासगी कंपनीच्या एका वसुली कर्मचाऱ्यास लुटल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एक घटना घडल्याने पोलिसांसमोर एक नवीनच मोठे आव्हान उभे राहिले आहे.

loading image
go to top