

Ladki Bahin Yojana Installments Delayed
Sakal
चाकूर - महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या व्यवस्थेच्याच जाळ्यात अडकली आहे. केवायसीच्या नावाखाली विचारण्यात आलेले दिशाभूल करणारे प्रश्न अनेक लाडक्या बहिणींसाठी घातक ठरले असून, हजारो महिलांचे हप्ते अचानक बंद झाले आहेत.