
Beed News
sakal
बीड : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे परिणाम अजूनही दिसून येत असून बालाघाटाच्या कुशीत वसलेल्या कपिलधारवाडीमध्ये डोंगर खचण्याची भीती वाढू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री घरांना पडलेले तडे, आता वाढत चालल्याने वस्तीवरील संकट अधिक गडद होत आहे. कपिलधारवाडीचे माळीण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.