esakal | उशिरा पेरणी झालेली पिके संकटात
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिकात्मक छायाचित्र

आधीच तब्बल दीड महिना खरीप हंगामाची पेरणी उशिरा झाली असून काहीतरी उत्पन्न हाताला लागेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला असून फवारणी करूनही रोग आटोक्‍यात येत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कधी अस्मानी तर कधी नैसर्गिक संकट शेतकऱ्यांवर आहे. 

उशिरा पेरणी झालेली पिके संकटात

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा(जि. लातूर) ः आधीच तब्बल दीड महिना खरीप हंगामाची पेरणी उशिरा झाली असून काहीतरी उत्पन्न हाताला लागेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला असून फवारणी करूनही रोग आटोक्‍यात येत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कधी अस्मानी तर कधी नैसर्गिक संकट शेतकऱ्यांवर आहे. 


यंदा तालुक्‍यात दोन टप्प्यांत पेरणी झाली असून मोसमी काळात पेरणी झालेल्या पिकांची स्थिती चांगली आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली नव्हती, पण त्यानंतर आलेल्या अल्प पावसावर काहीतरी उत्पन्न हाती लागेल म्हणून काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली, त्यामध्ये सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

पाने कुरतडणारी अळी, खोड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पाने चाळणीसारखी झाली आहेत. ही अळी आटोक्‍यात आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध कीटकनाशके वापरून फवारणी केली असतानाही ती आटोक्‍यात येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे. 


सध्या काही भागांतील पिकांना फळधारणा होऊन शेंगा तयार झाल्या आहेत, तर उशिरा पेरणी झालेली पिके सध्या चट्टे व फुलधारण काळात आहेत. त्यामुळे या बेमौसमी काळात पेरणी झालेली पिके संकटात सापडली आहेत. अनेकवेळा फवारणीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत असून या पिकाच्या उत्पादनात घट येण्याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. 

loading image
go to top