
marathwada flood
esakal
मराठवाड्यातील पूराचा हाहाकार अजूनही सुरूच आहे. हा पूर आता जिवघेणा ठरत आहे. कन्नड तालुक्यातील निपाणी आणि पिशोर येथे दोन मुले पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आधी शेती गेली आता पोटचे पोरं देखील वाहून जात आहेत. हा अघोर पूर कधी थांबेल असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.