esakal | लातूर मारहाण प्रकरण: कोण आहेत किर्तनकार शिवानंद हैबतपुरे?
sakal

बोलून बातमी शोधा

latur

लातूर मारहाण प्रकरण: कोण आहेत किर्तनकार शिवानंद हैबतपुरे?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदपूर : लिंगायत आंदोलनात प्रामुख्याने सहभागी असणारे बी.एस.एल.एल.एल.बीचे शिक्षण घेऊन वकील झालेले शिवानंद उद्धवराव हैबतपुरे हे वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून प्रदेश महासचिव पदावर काम करतात.किर्तनकार, व्याख्याते, लिंगायत समाजाचे नेते असलेले शिवानंद हैबतपुरे हे महात्मा बस्वेश्वर यांच्या जीवन कार्य व्याख्यानाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात.

हेही वाचा: स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?

भक्तांना ज्ञान व दिशा मिळावी या हेतुने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे म्हणून डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी तमाम समाज बांधव व भक्तांसाठी भक्तीस्थळाचे निर्माण केले. भक्तीस्थळावर कोण्या एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची मक्तेदारी नसावी, भक्तीस्थळ आर्थिक शोषणाचा किंवा राजकारणी अड्डा होऊ नये. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संकल्पनेतील भक्तीस्थळ रहावे अशी आमची व महाराजांच्या सच्च्या भक्तांची भूमिका आहे.आमची भूमिका कांही समाजकंटकांना मान्य नसल्याने कट रचून जाणीव पुर्वक माझ्यावर हल्ला केला असून माझे अपहरण करून मला  मारण्याचा डाव फसला असल्याचे शिवानंद हैबतपुरे यांनी सांगीतले.

हेही वाचा: अफगाणिस्तानात तालिबान उद्याच करणार सत्ता स्थापन?

डॉ.शिवलींग शिवाचार्य व कांही समाज बांधवाच्या सहकार्याने अहमदपूर पासून नांदेड कडे सहा किलोमिटर अंतरावर सन 2008 साली हगदळ शिवारात भक्तीस्थळाची निर्मिती झाली.सोळा एकर जागेतील या भक्तीस्थळावर महाराजांची समाधी, सभा मंडप व गुरूकूल असून गुरूकूल मधे विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण, किर्तन, भजनाचे धडे दिले जातात. शिवानंद हैबतपुरे यांच्या मारहाणी संदर्भात बारा जणांवर अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून सध्या एकही आरोपी अटक झाला नाही.

loading image
go to top