शहरातील वीज ग्राहकांकडे एक कोटी थकबाकी; महावितरणची वसुलीसाठी ग्राहकांच्या घरोघरी पायपीट

शिवशंकर काळे
Monday, 22 February 2021

एक महिन्यात अठरा लाख रुपये वसुली झाली असल्याचे महावितरण कर्मचारी सचिन टाले यांनी सांगितले

जळकोट (लातूर): महावितरणची शहरातील वीज ग्राहकांकडे एक कोटी आठरा लाख रुपये थकबाकी असल्याने महावितरणने वसुली मोहीम हाती घेतली आहे. एक महिन्यात अठरा लाख रुपये वसुली झाली असल्याचे महावितरण कर्मचारी सचिन टाले यांनी सांगितले.
कोरोनामुळे एक वर्षे  लॉकडाऊन पडला होता. त्यामुळे मोठ्या छोट्या व्यवसायासह सर्वसामान्यांना घरात बसून पोट भरावे लागले.

शासनाने कोरोना काळातील विजबीले काही प्रमाणात माफ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ग्राहकांनी विजबील माफ होण्याची वाट पाहत बसल्याने वीज ग्राहकांकडे वर्षापासूनची विजबीले थकीत राहून गेली आहेत. दरम्यान शासनाने विजबीले माफ होणार नसल्याची घोषणा केल्यानंतर वीज ग्राहकांना चांगलाच शाॉक लागला आहे. महावितरणकडून विजभरणा नाही केल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येईल अशी घोषणा केल्याने ग्राहक चांगलाच संतापला आहे. जळकोटच्या महावितरण कर्मचाऱ्यांकडून सकाळी नऊ वाजल्यापासून वसुली मोहीम चालू केली आहे.

'रस्त्यांच्या कामांत जाणून बुजून अडथळा आणाल तर सोडणार नाही'...

वसुली नाही दिल्यास दोन ते तीन दिवसांत वीज कनेक्शन तोडली जाणार असल्याचे महावितरणकडून सांगितले जात आहे. शहरातील काही व्यक्ती वीज भरणा करत असून सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा असल्याने विजबीलाचा भरणा कसा करावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महावितरणकडून एक महिन्यापासून थकीत विजबीलाची वसुली चालू असून एका महिन्यात आठरा लाख रुपये वसुली करण्यात आली आहे. शहरात अजूनही महावितरणची एक कोटी रुपयांची विजबीलाची थकबाकी वसुली करणे बाकी आहे. महावितरणकडून वीज ग्राहकांना थकीत वीज बीले भरण्याचे आवाहन घरोघरी जाऊन महावितरणचे कर्मचारी करताना दिसून येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur breaking news electricity consumers in the city jalkot thakbaki news 1 crore