esakal | देशसेवेनंतर माजी सैनिक रमला शेतात, चाळीस हजारांच्या गुतंवणुकीतून तीन लाखांपेक्षा जास्त नफा

बोलून बातमी शोधा

ausa}

गेल्यावर्षी त्यांनी कलिंगड केले मात्र ते लॉकडाऊन मध्ये अडकले मात्र त्यांनी गावोगावी स्वतःच्या ट्रॅकरद्वारे घरपोच विक्री केली

देशसेवेनंतर माजी सैनिक रमला शेतात, चाळीस हजारांच्या गुतंवणुकीतून तीन लाखांपेक्षा जास्त नफा
sakal_logo
By
जलील पठाण

औसा (लातूर): अठ्ठावीस वर्षे देशाच्या सीमांचे संरक्षण आणि कारगील युद्धात शत्रूला धूळ चारलेल्या माजी सैनिकाने शेतीत कष्ट करीत एका एकरात कलिंगड लागवडीतून तीन लाख साठ हजार रुपयांचे उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे याला खर्च अवघा चाळीस हजार आला असून खर्च वजा जाता तीन लाख वीस हजार रुपये निव्वळ नफा हातात राहिला. एकीकडे शेती परवडत नसल्याची ओरड करणाऱ्या लोकांचा आकडा वाढत असतांना या माजी सैनिकाने रचलेल्या इतिहासाची सगळीकडे चर्चा आहे.

उंबडगा (ता. औसा) गावाचे माजी सैनिक जलील अमीर पटेल यांनी देशसेवेत २८ वर्षे सेवा केली. लान्सनायक, हवालदार मेजर आदी हुद्द्यावर काम केले. कारगिल युद्धच्या वेळी ते देशसंरक्षण करतांना तंगधार येथे शत्रूच्या समोर उभे होते. सेवा निवृत्तीनंतर त्यांनी शेतीकडे लक्ष दिले. त्यांना आठ एकर शेती असून दर वर्षी ते कलिंगड, खरबूज पिकाची लागवड करतात. जिद्दी आणि हार न मानण्याची मानसिकता देशसेवेतच अंगी बाळावल्याने शेती करतानाही त्यांनी शेती कशी परवडत नाही? याचा अभ्यास केला. नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी फळपिके घेण्यास सुरुवात केली.

Scam: नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयाला गंडविले

गेल्यावर्षी त्यांनी कलिंगड केले मात्र ते लॉकडाऊन मध्ये अडकले मात्र त्यांनी गावोगावी स्वतःच्या ट्रॅकरद्वारे घरपोच विक्री केली. अनेकांनी उकिरड्यावर ही फळे फेकुन दिली असतांना त्यानी एक लाखाचा निव्वळ नफा कमावला. यंदा त्यांनी मॅक्स जातीचे कलिंगड लागवड केली. गेल्या वर्षीचे जपून ठेवलेले मल्चिंग पुन्हा या वर्षी वापरले. संतुलित खताचा आणि आवश्यक त्या औषधांचा वापर केला. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी या वर्षी एक एकरात बेचाळीस टन उत्पादन घेतले. त्यांनी जागेवर साडे आठ रुपये किलो दराने व्यापाऱ्याला दिले.

उस्मानाबाद जिल्हा बँकेस शासकीय थकहमीच्या प्रस्तावास पहिल्या टप्प्यात वीस कोटी...

हा माल दिल्ली, बेल्लारी या ठिकाणी विक्रीसाठी घेतला जात आहे. एका फळांचे वजन जवळ पास कमाल दहा किलो तर किमान अडीच किलो आहे. त्यामुळे त्यांचा शंभर टक्के माल विक्री होत आहे. त्यांना हे पीक आणण्यासाठी केवळ चाळीस हजार रुपये खर्च आला आहे. आणि विक्रीतून तीन लाख साठ हजार रुपये मिळाले तर खर्च वजा जाता त्यांना तीन लाख वीस हजार रुपये हातात राहिले राहत आहेत.  त्यांच्या कष्टाची आणि जिद्दीची चर्चा संपूर्ण तालुक्यात असून शेती ही परवडतेच फक्त त्यात कष्ट करण्याची तयारी ठेवा असे ते सांगतात.