Latur : निलंग्यात राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News
Latur : निलंग्यात राज्य शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध

Latur : निलंग्यात राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : महाविकास आघाडी सरकारच्या महावितरण विभागाने शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडण्यासाठी व ट्राँसफार्मर जळाल्यानंतर पैसे भरा, तरच ट्राँसफार्मर मिळेल अशा शेतकरी विरोधी फतव्याचा निषेध करत माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्या नेतृत्वाखाली (Nilanga) शिवाजी चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत गुरूवारी (ता.१८) तब्बल तीन तास महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi) प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत निषेध नोंदवला. येथील शिवाजी चौकातुन महाविकास आघाडी सरकारचे प्रतिकात्मक प्रेत तयार करून तिरडी (Latur) तयार करण्यात आली होती. या प्रतिकात्मक तिरडीला स्वतः निलंगेकर व भाजप जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी शेवटपर्यंत खांदा दिला होता. अंत्ययात्रेसमोर गाडग्याचे शिकाळे धरून एक शेतकरी शोकाकूल अवस्थेत चालत होता.

हेही वाचा: दु:ख अनावर झाल्याने मुलीने वडिलांच्या मृतदेहाजवळच सोडला जीव

निलंगा मतदारसंघातील अनेक गावातील शेतकरी उलटी हलगी वाजवत या अंत्ययात्रेत सामील झाले होते. शहरातील शिवाजी चौकातून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत शेतकरी तहसिल कार्यालयासमोर प्रतिकात्मक प्रेताचे अंत्यविधी करण्यासाठी गेले. मात्र तेथे निलंगा येथील पोलिस अधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक प्रेत व तिरडी ताब्यात घेऊन अंत्यविधी करू दिला नाही. यावेळी अयोजित प्रतिकात्मक शोकसभेत बोलताना निलंगेकर म्हणाले की, अतिवृष्टी व पूरपरिस्थिती यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असताना शासनाने मदत करणे अपेक्षित होते. मात्र मदत तर दूरच राहिली उलट शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीजबिल वसुलीच्या नावाखाली वीजपुरवठा तोडण्याचा अन्यायकारक प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू असल्याचा आरोप करून बहुतांशी शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या रब्बी पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ असताना बिलासाठी वीजपुरवठा खंडित करणारा काळा जीआर काढून शेतकऱ्यांना संकटात टाकणारा दुर्दैवी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. वीज विभागाने काढलेला काळा जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा, 3 एचपीसाठी १६ हजार रुपये आणि पाच एचपीसाठी २५ हजार रुपये ही वीज बिलाची सक्ती थांबवावी, शेतकऱ्यांची तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करावे या मागणीसाठी शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकारला भानावर आणण्यासाठी सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून जाहीर निषेध करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: MG Astor कार ग्राहकांची सर्वोत्तम चाॅईस, फिचर्स घ्या जाणून

शेतकऱ्यांना द्यायचे आणि ट्राँसफार्मरच्या माध्यमातून वसूल करायचे असे हे वसूली सरकार आहे. अतिवृष्टीमुळे अगोदरच शेतकऱ्यांचे खरीप हंगाम वाया गेले आहे.आता शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर असताना महाविकास आघाडी सरकार करीत असल्याचा आरोप श्री. निलंगेकर यानी केला आहे. यावेळी कराडे म्हणाले, लातूरचे पालकमंत्री दाखवा आणि दोन हजार मिळवा असा अरोप करून त्यानी पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर सडकून टीका केली. तसेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वा-यावर सोडून सत्तेची मस्ती डोक्यात शिरलेले सर्वच मंत्री शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाच फोडू शकत नाहीत. तसेच जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भाजप उमेदवाराचे अर्ज वैध ठरल्यामुळे ते लातूरला येत नाहीत, असा आरोप कराड यांनी केला आहे. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळूंके, प्रेरणा होनराव, नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, मनोज कोळ्ळे, संजय दोरवे, मंगेश पाटील, गोविंद चिलगुरे, सभापती राधा बिराजदार, चेअरमन दगडू सोळुंके, शाहूराज थेटे, प्रशांत पाटील, विष्णू ढेरे, प्रदीप पाटील, शाहूराज पाटील यासह शेतकरी सामील झाले होते.

loading image
go to top