पहिल्या लाटेत व्यक्तीला तर दुसऱ्या लाटेत कुटुंबांना सावरले

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने खास कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या समुपदेशन केंद्राला दुसरी लाट जडच गेली
covid 19
covid 19covid 19

लातूर: कोरोनाच्या पहिल्या लाटेत घरातील एकाच व्यक्तीला कोरोनाची लागण व्हायची. त्याचे समुपदेशन करून धीर दिला जात होता. पहिल्या लाटेत कोरोनाबाबतचे गैरसमज दूर केले जायचे. दुसऱ्या लाटेत ही परिस्थिती पूर्ण बदलून केली. सर्व कुटुंबच कोरोनाच्या तावडीत सापडले होते. घरातील सर्वच व्यक्ती एकमेकांची काळजी करायचे. ही काळजी वाहताना अनेकांना स्वतःची काळजी करता आली नाही. एक ना अनेक वेदनादायी प्रसंग पचवून एकानंतर दुसऱ्या कुटुंबांना सारवताना समुपदेशकांची कसरत झाली. दोन महिन्यात समुपदेशकांनी रुग्ण व त्यांच्या कुटुंबांना लाखो कॉल केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने खास कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या समुपदेशन केंद्राला दुसरी लाट जडच गेली. पहिल्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांना समुपदेशनातून मानसिक आधाराची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी हा समुपदेशन केंद्राचा उपक्रम सुरू केला होता. पहिल्या लाटेत कोरोना आजाराची माहिती नसल्याने रुग्णांत भीती व गैरसमज होते. ते दूर करण्याचे काम समुपदेशकांनी केले. दुसऱ्या लाटेत सर्वांना कोरोनाची माहिती होती. मात्र, त्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठीचे मानसिक बळ नव्हते. पूर्वी रुग्णाला त्याचे कुटुंब व नातेवाईक सावरत होते. दुसऱ्या लाटेत कुटुंब व नातेवाईकच कोरोनाच्या तावडीत सापडल्याने कोणी कोणाला सावरायचे, हा प्रश्न होता. समुपदेशकांनी ही जबाबदारी काळजीने पार पाडली.

covid 19
म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन पुरवठ्याची माहिती सादर करण्याचे केंद्र शासनाला आदेश

संवाद साधताना बहुतांश रुग्णांनी त्यांच्या कुटुंबांची काळजी करत त्यांना मदत करण्याची विनंती केली. यातूनच कुटुंबांतील व्यक्तींनाही समुपदेशकांनी संवाद साधत त्यांना कोरोना तपासणी, उपचार, धान्य व अन्य सर्व मदत उपलब्ध करून दिली. कमी मीठ व तिखटाचे भोजन उपलब्ध करून देण्यासोबत पिण्यासाठी गरम पाण्याचीही व्यवस्था केली. काही कुटुंबांना धान्याचे कीट आणि नातेवाइकांची मदत मिळवून दिली. कोरोनामुळे व्यक्ती मृत झाल्यानंतर उर्वरित सदस्यांसाठी सरकारी योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ देण्यासाठीही समुपदेशकांनी पुढाकार घेतल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी सांगितले.

रुग्णांचे मनोबल वाढवले
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., निवासी उपजिल्हाधिकारी ढगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशक शाहुराज भोसले, दीपक सगर, रवीचंद्र वांजरे, वंदना मुंडे, सुवर्णा जाधव यांच्यासह १६ समुपदेशक रात्रंदिवस रुग्णांचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न करीत होते. प्रसंगी अधिकारीही रुग्णांशी बोलून त्यांना धीर देत त्यांच्या अडचणी जाणून घेत उपचारासाठी प्रतिसाद वाढवत होते. उपचाराची चर्चा झाली. मात्र, समुपदेशनाचा उपक्रम नकळत रुग्ण व त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा देऊन घेऊन गेला. कोणी तरी आपली काळजी करते, ही भावना सर्वांना सुखावून गेली.

covid 19
Corona Update: मराठवाड्यातील रुग्णसंख्या येतेय आटोक्यात

कुटुंबांना सारवताना कस
पहिल्या लाटेत दहा एप्रिल २०२० पासून २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत तब्बल ११ महिने समुपदेशनाचा यज्ञ सुरू होता. या काळात समुपदेशकांनी ६३ हजार ४०४ रुग्णांना एक लाख ४७ हजार १३२ कॉल केले. दुसऱ्या लाटेत जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी आठ एप्रिलपासून समुपदेशन केंद्र सुरू केले. यात एप्रिलच्या २८ दिवसांत मोठ्या संख्येने रुग्णांना सावरताना समुपदेशकांचा कस लागला. या काळात ३८ हजार ८८१ रुग्णांना ७७ हजार ७६२ कॉल करावे लागले. मेमध्ये १६ हजार ६८१ रुग्णांना ३३ हजार ३६२ तर चालू महिन्यात ५१३ रुग्णांना दोन हजार ५२ कॉल केले. दुसऱ्या लाटेत १७ हजार १९४ रुग्णांना एक लाख १३ हजार १७६ कॉल करून सावरले. दुसऱ्या लाटेत कमी रुग्णसंख्या असताना जास्त कॉल करावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com