
लातूर: लातूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. एकाच दिवशी 291 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या पाच महिन्यात एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण येण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता महापालिकेच्या वतीने मुंबई, पुण्याहून येणाऱया प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे.
जिल्ह्यात मार्चच्या सुरवातीपासूनच कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या पाच सहा दिवसात दररोज सरासरी बाधितांचा आकडा दोनशेच्या घरात गेला होता.
त्यात बुधवारी तर 291 रुग्ण आले. यात एक हजार 172 जणांच्या ॲन्टीजेन टेस्ट झाल्या यात 116 जण पॉझिटीव्ह तर दोन हजार 64 जणांच्या ॲंटिजेन टेस्ट झाल्या यात 175 रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा 27 हजार 433 वर गेला आहे. आतापर्यंत 718 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 483 जणावर उपचार सुरु आहेत. तर 25 हजार 232 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान मुंबई, पुणे जिल्ह्यातील सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेता त्यातून लातूरकरांना धोका होऊ नये यासाठी आता मुंबई, पुण्यातून लातुरात येणाऱ्या प्रवाशांची चौकशी करण्यात येणार आहे. कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना तपासणी करण्याचा सल्ला दिला जाणार असून महानगरपालिकेने यासाठी पीव्हीआर चौकात स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे.
मुंबई व पुणे जिल्ह्यात सध्या कोविड 19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. लातूरचा मुंबई आणि पुण्याशी दैनंदिन संबंध असतो.जवळपास 60 खासगी ट्रॅव्हल्स दररोज लातूर-पुणे ये-जा करत असतात. यातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक केली जाते.
या प्रवाशांपैकी कोणाला कोरोनाची लागण झालेली असेल तर त्यातून धोका होऊ नये यासाठी महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे दररोज पुण्याहून लातुरात येणाऱ्या प्रत्येक गाडीतील प्रवाशांची चौकशी केली जाणार आहे. यासाठी पथक प्रमुख म्हणून आरोग्य सहाय्यक व्ही.पी. कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीव्हीआर चौक येथे सकाळी 5 ते 8.30 या कालावधीत हा उपक्रम राबवला जाणार आहे.
लातूर कोरोना मीटर-
एकूण बाधित- 27433
उपचार सुरु असलेले- 1483
बरे झालेले- 25232
मृत्यू- 718
(आजचे पॉझिटीव्ह-291-- आजचे मृत्यू--एक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.