esakal | धक्कादायक! लातुरात मतिमंद महिलेचे बाळ दुसऱ्याच्या नावावर
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

धक्कादायक! लातुरात मतिमंद महिलेचे बाळ दुसऱ्याच्या नावावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदपूर (लातुर): निलंगा तालुक्यातील एका ३० वर्षीय मतिमंद महिलेचे बाळ दुसऱ्या महिलेचे भासवून मतिमंद आईचा प्रसूतीचा पुरावा नष्ट केला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याच्या एका खटल्यातील संशयित आरोपी शाहूबाई सौदागर पवार हिच्या चौकशी दरम्यान तिच्याकडे असलेले तीन महिन्यांचे बाळ निलंगा येथील एका मतिमंद महिलेचे असल्याचे समजले. ती २० फेब्रुवारी २०२१ ला अहमदपूरमध्ये एका खासगी रुग्णालयात बाळंत झाली होती.

त्यापूर्वी निलंगा तालुक्यातील मतिमंद महिलेच्या आई-वडिलांना अमर पाटील ऊर्फ अमित गायकवाड हे भेटले होते. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या अहमदपूरमधील अनिता राम जाधव यांना त्यांच्या भावासाठी बाळाची गरज असून, ते दीड लाख रुपये देऊन बाळ खरेदी करणार आहेत, असे सांगितले. त्यानुसार अमर यांनी अनिता यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, मतिमंद महिलेस अहमदपूरला आणण्यात आले. त्यानंतर तिचे बाळंतपण दहा दिवसांवर असताना अनिताने बाळंतपणासाठी तिच्या आई-वडिलांकडे पैसे मागितले.

हेही वाचा: लॉकडाउनमध्ये Dating app चा वापर वाढला, व्हिडीओ कॉलही वाढले

बदनामीच्या भीतीपोटी मतिमंद मुलीच्या आई-वडिलांनी म्हैस विकून २५ हजार रुपये जमा करून दिले. परंतु, मतिमंद महिलेला बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल करताना वेगळेच नाव नोंदविले. त्यानंतर सत्यभामा या महिलेकडे तीन महिन्यांचे बाळ पोलिसांना आढळून आले. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नागोराव जाधव यांच्या तक्रारीवरून अनिता राम जाधव, बालाजी श्रीपती गुंडाळे, मनीषा बालाजी गुंडाळे, शाहूबाई सौदागर पवार, अमर पाटील, राम गुणवंतराव बिरादार, नीलाबाई राम बिरादार यांच्यासह शहरातील एका खासगी डॉक्टराविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

loading image