32 Years After Latur Earthquake
esakal
-अविनाश काळे
उमरगा : धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयकारी भूकंपाला (Latur Earthquake) ३२ वर्षे पूर्ण झाली. पण, दरम्यानच्या काळात पुनर्वसित गावांतील प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहेत. भूकंपग्रस्त लाभार्थींना नोकरीत तीन टक्के आरक्षण मिळण्याचा लढा शासन दरबारी अजूनही सुरू आहे. भूकंपाचा जबर फटका धाराशिव व लातूर या दोन्ही जिल्ह्यांतील उमरगा, लोहारा, औसा व निलंगा तालुक्यांतील ५२ गावांना बसला.