एटीएम फोडले, पण गुन्ह्याची नोंद नाही

ATM Broken Deoni
ATM Broken Deoni

देवणी (जि.लातूर) ः शहरातील मध्यवस्तीतील लातूर मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे एटीएम फोडल्याप्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झाला नाही. त्यामुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील आडत लाईनमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य शाखा कार्यरत आहे. या शाखेत असलेले एटीएम सोमवारी (ता.१६) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब सकाळी बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळी संबंधीत घटनेची माहिती देवणी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी ठसे तज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करुन तपासाला गती दिली आहे. दरम्यान बँक शाखेतील एटीएममधील रक्कमेची प्राथमिक चौकशी केली असता रक्कम सुरक्षित असल्याचे आढळुन आले आहे. मात्र रक्कम असलेल्या पेटीचे डिजिटल कुलुप कंपनीच्या परवानगीशिवाय काढता येत नसल्यामुळे रक्कमेबाबत फिर्याद देण्यास तांत्रिक अडचण असल्याने बुधवारी (ता.१८) दुपारपर्यंत देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.


शहरातील एटीएम फोडलेल्या घटनेला दोन दिवस झाले आहेत. संबंधित एटीएमचे लॉक अर्धवट तोडलेले असल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. एटीएमचे लॉक तोडण्याचे नियोजन केले तर तेथे आग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर संबंधित घटनेसंदर्भात गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.
- चिंताबर कामठेवाड, पोलीस निरीक्षक, देवणी


उदगीरच्या बाजारात सोयाबीन दर पुन्हा घसरले
उदगीर : मागील एक महिन्यापासून सोयाबीनच्या दरात सुरू असलेली घसरण अद्याप थांबलेली नाही. मंगळवारी (ता. १७) उदगीरच्या बाजारात चांगल्या प्रतीचे सोयाबीन तीन हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाल्याने शेतकरी व व्यापारी चिंतातुर झाले आहेत. दर वाढतील या आशेने साठवणूक केलेले व्यापारी व पाडव्याच्या मुहूर्तावर जास्तीचे पैसे हाती येतील. या आशेवर विक्री न केलेल्या शेतकऱ्यांची आता चिंता वाढवली आहे.


डिसेंबर महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दराने चार हजारांचा टप्पा ओलांडला, तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार हजार दोनशे, तर याच महिन्यात चार हजार चारशेपर्यंत भाव वाढले होते. त्याच वेळी काही जाणकार लोकांनी सोयाबीन लवकरच पाच हजारांचा टप्पा गाठणार म्हणून सांगत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बाजारात माल विक्रीला आणला नाही व भविष्यात भाववाढ होईल व चांगला फायदा होईल म्हणून अनेक व्यापाऱ्यांनीही सोयाबीन खरेदी करून गोदामात ठेवला आहे; परंतु कोरोनामुळे बाजारात जबरदस्त मंदीची लाट पसरल्याने त्याचा फटका सोयाबीनला बसला आहे. मुळातच सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोयाबीनवर फार लवकर होतो. चीनमधून सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साथ जगभर पसरली आहे.

त्याचा जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर चिकन सेवनाबाबत अफवा पसरल्यामुळे पोल्ट्री उत्पादकांच्या मागणीवर विपरीत परिणाम झाला आहे. या सगळ्या घटकांचा परिणाम म्हणून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दर वाढतील व पाडव्याच्या सणासमोर शेतीच्या मशागतीच्या काळात हाती चांगला पैसा हाती येईल या आशेने ठेवलेले सोयाबीन अतिशय कमी दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com