esakal | रॅगिंगला कंटाळून पिले विष, पण व्हायरल क्लिपमधला अमोल कोण... 
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये फक्त अमोल असा उल्लेख आहे. पण महाविद्यालयात अमोल नावाचे अनेक विद्यार्थी असल्याने नेमका हा अमोल कोण, याची चौकशी पोलीस करत आहेत.

रॅगिंगला कंटाळून पिले विष, पण व्हायरल क्लिपमधला अमोल कोण... 

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर : धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल महाविद्यालयाच्या एका प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पिंपळनेर (जि.बीड) पोलिस ठाण्याच्या हद्दीत रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बीड पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (ता 12) या मेडिकल महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची चौकशी करून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप यांनी दिलेली अधिक माहिती अशी, की उदगीरच्या धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज येथे प्रथम वर्षात शिकणारा गणेश म्हेत्रे (वय-20) रा.नालवंडी (ता.बीड) याने गेल्या चार-पाच दिवसापूर्वी नाळवंडी येथे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यांमध्ये माझ्या मुलास रॅगिंग करून आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याची फिर्याद दिल्यावरून आत्महत्येस प्रवृत्त कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

हा जवान विसरणार नाही धनंजय मुंडे यांचे उपकार

याप्रकरणी मंगळवारी (ता.12) बीड पोलिसांच्या पथकाने येथील धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल महाविद्यालयास भेट दिली. यासंदर्भात फोनवरून गणेश व या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी यांच्यात झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही क्लिप बीड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.या ऑडिओ क्लिपनुसार ज्यांच्या संदर्भ आहे व यासंदर्भात अधिक माहिती मिळावी यासाठी महाविद्यालयातल्या द्वितीय वर्षातील तीन विद्यार्थ्यांची तर प्रथम वर्षातील एका विद्यार्थ्यांची चौकशी केली.

पहा लातूरच्या कलेक्टरने असा केला डान्स

या चौकशीनंतर बीड पोलिसांनी द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पिंपळनेर पोलिस ठाण्यात त्याची अधिक चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री सानप यांनी सांगितले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्री. सानप यांच्यासह दोन पोलिस कर्मचारी होते. त्यांना ग्रामीण पोलीस ठाण्याचे शिवाजी केंद्रे व तुळशीराम बरुरे या पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या प्रकरणाची येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठाणे पुस्तिकेत नोंद घेण्यात आली आहे.

क्लिपमध्ये अमोल नावाचा उल्लेख....

या व्हायरल झालेल्या क्लिप मध्ये अमोल नावाच्या विद्यार्थ्याने गणेशशी संवाद साधला व फोनवरून धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे. ही क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र यात फक्त अमोल असा उल्लेख असल्याने महाविद्यालयात अमोल नावाचे अनेक विद्यार्थी असल्याने नेमका हा अमोल कोण, याची चौकशी पोलीस करत आहेत.

loading image