

The Sahakar panel retained control of Latur District Central Cooperative Bank by winning 14 seats.
esakal
लातूर: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या१९ संचालक मंडळांसाठी झालेल्या निवडणुकीतही १५ जागा जिंकत माजी मंत्री दिलीपराव देशमुख व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या सहकार पॅनलने वर्चस्व कायम ठेवले आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर व रमेश कराड यांच्या पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले.
जिल्हा बँकेत सत्ता असणारे देशमुख व सहकारमंत्री पाटील यांनी निवडणुकीत सहकार पॅनल तर आमदार निलंगेकर, संजय बनसोडे, कराड यांनी छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनल तयार केले होते.