
Latur Earthquake
sakal
लातूर : लातूर तालुक्यातील बोरवटी गावात शुक्रवारी (ता. २६) सकाळी साडेसहाच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यासंदर्भात राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (नवी दिल्ली) येथे ही माहिती देऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने चौकशी केली आली असता २.२ रिश्टर स्केल इतक्या सौम्य भूकंपाची नोंद झाल्याचे केंद्राने जाहीर केले.