
Latur Floods
sakal
लातूर : भारतीय हवामान खात्याने लातूर जिल्ह्यास शनिवारी ऑरेंज अलर्ट दिले असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून अपेक्षित मुसळधार पाउसाचे अंदाज लक्षात घेता खबरदारीचे उपाय म्हणून मांजरा धरणातून आजपासूनच ६ हजार ३८८ क्युसेक आणि तेरणा धरणातून १ हजार ८६४ क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे.