esakal | लातूर पाऊस अपडेट्स : अतिवृष्टीमुळे मदनसुरी ओढ्यावरील पुल गेला वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

Madansuri Bridge

मदनसुरी (ता.निलंगा) येथील मदनसुरी-किल्लारी रस्त्यावरील मदनसुरी ओढ्यावरील पुल मंगळवारी (ता.१३) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेला आहे.

लातूर पाऊस अपडेट्स : अतिवृष्टीमुळे मदनसुरी ओढ्यावरील पुल गेला वाहून

sakal_logo
By
सिद्धनाथ माने

मदनसुरी (जि.लातूर) : मदनसुरी (ता.निलंगा) येथील मदनसुरी-किल्लारी रस्त्यावरील मदनसुरी ओढ्यावरील पुल मंगळवारी (ता.१३) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. हा पूल चार वर्षांपासून पूर्णपणे निकमी झाला होता. चार ते पाच वर्ष झाले तरीही त्याची दुरुस्ती झाली नाही. मुरमाड माती टाकून डागडुगजी करून शासनाकडून काम भागवल जात होते. मात्र रात्रीच्या अतिवृष्टीने हा पूल वाहून गेला आहे.


निलंगा-किल्लारी रस्त्यावरील मदनसुरी ओढ्यावरील पूल गेली चार-पाच वर्षांपासून नादुरुस्त होता. उंची कमी असल्याने थोडाही पाऊस झाला की या पुलावरून पाणी यायचे. त्यामुळे पुलाचे मोठे नुकसान झाले होते. या पुलाची एक बाजू पूर्णपणे अगोदरच वाहून गेली होते. हा पूल जवळपास तीस ते चाळीस वर्षापूर्वी बांधलेला असल्याने हा निकामी झाला आहे. दुरुस्ती करावी अशी मागणी अनेक वेळा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. या मार्गावरून निलंगा येथून येणाऱ्या मदनसुरी मार्गे रामतीर्थ, कामलेवाडी, कोळगाव, नदीहत्तरगा, एकोजी मुदगड येथील नागरिक, विद्यार्थी प्रवास करत असतात.

लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले, ३५ मंडळात अतिवृष्टी, शेतकरी अडचणीत !

मदनसुरी व निलंगा येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र हा पूल वाहून गेल्याने दहा ते पंधरा गावचा संपर्क तुटला आहे. मदनसुरी येथील शेतकऱ्यांना शेतीला जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी अनेक वेळा प्रस्ताव पाठवले तरी निधी मिळत नसल्याने हा पूल नादुरुस्त असल्याचे शासनाचे अधिकारी सांगत आहेत. नवीन पुलाची मागणी करूनही अजून मंजुरी मिळाली नाही. डोंगरगाव, हाडोळी, अंबुलगा, हंद्राळ अशा अनेक गावांचे दहा ते पंधरा किलोमीटर एवढ्या दुरून पाणी येते. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधावा अशी मागणी या मार्गावरील प्रवाशी, शेतकरी करित आहेत.


संपादन - गणेश पिटेकर