लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले, ३५ मंडळात अतिवृष्टी, शेतकरी अडचणीत !

हरी तुगावकर
Wednesday, 14 October 2020

दहा मंडळात शंभर मिलीमिटर पेक्षा अधिक पाऊस, निलंगा तालुक्यात सर्वाधिक फटका ! शेकडो हेक्टर जमिनीचे नुकसान 

लातूर : लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्या नुसार जिल्ह्याला बुधवारी (ता. १४) रात्री पावसाने चांगलेच झोडपले. यात ३५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे तर दहा मंडळात १०० मिलीमिटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात निलंगा तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. रात्रीतून या तालुक्यात ११० मिलीमिटर पाऊस झाला आहे. याचा शेतात असलेल्या खरीपाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्यात आतापर्यंत ८५९.४ मिलीमीटर म्हणजे ११५.४ टक्के पाऊस झाला आहे. त्यात लातूर तालुक्यात १०२.५ टक्के, औसा १४०.४ टक्के, अहमदपूर १०८.६ टक्के, निलंगा १३२.३ टक्के, उदगीर ११४.८ टक्के, चाकूर ९४.२ टक्के, रेणापूर ११६ टक्के, देवणी १४४.१ ट्कके, शिरुर अनंतपाळ १२३.९ टक्के, जळकोट १२३.५ टक्के पाऊस झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी ६८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.  त्यात लातूर ५६.४, औसा ८१.६, अहमदपूर २८,  निलंगा ११०.८, उदगीर ६४.८, चाकूर ६५.३, रेणापूर ३४.९, देवणी ९०.४,  शिरुर अनंतपाळ ७९.४,  जळकोट तालुक्यात २५.४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. यात ३५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

महसूल मंडळनिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे -

 

 • लातूर तालुक्यात लातूर ७४.८, बाभळगाव ७७.३, हरंगुळ ४४.५, कासारखेडा ८०, मुरुड ३५.८, गातेगाव २८.३, तांदूळजा १८.८, चिंचोली ७४.३, कन्हेरी ७३.५, 
 • औसा तालुक्यात औसा ८४.३, लामजना १०५, मातोळा ६१.५, भादा ७०.५, बेलकुंड ८१.८, किनी ७८.५, किल्लारी १०७.८, उजनी ६३, 
 • अहमदपूर तालुक्यात अहमदपूर ३१, खंडाळी २९.५, किनगाव २४, अंधोरी २२.८, शिरुर ताजबंद ३२.८, हडोळती २८,
 •  
 • निलंगा तालुक्यात निलंगा १२५, पानचिंचोली ७५.३, निटूर ८५.५, औराद ८३, कासारबालकुंदा १४५.३, अंबुलगा १२४.८, मदनसुरी १०७.८, कासारशिरसी १२४.५, हलगरा ११४.३, भुतमुगळी १२२.३,  
 • उदगीर तालुक्यात उदगीर ६४.५, नागलगाव ८४.५, वाढवणा ४२.३, नळगीर ७३, मोघा ८६.३, हेर ५५.३, देवर्जन ५८.३, तोंडार ५४.३, 
 • चाकूर तालुक्यात चाकूर ६६, नळेगाव ७७, वडवळ ५९.५, शेळगाव ८३.३, झरी २८.३, आष्टा ७७.८ , 
 • रेणापूर तालुक्यात रेणापूर ५६, पोहरेगाव २०.५, पानगाव २७.५, कारेपूर ५१.८, पळशी १८.५, 
 • देवणी तालुक्यात देवणी ८१, बोरोळ ८८.५, वलांडी १०१.८, 
 • शिरुर अनंतपाळ तालुक्यात शिरुर अनंतपाळ ६६, साकोळ ९३.८, हिसामाबाद ७८.३ तर जळकोट तालुक्यातील
 • जळकोट १६.८, घोणसी मंडळात ३४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात सध्या खरीप पिके काढण्याचे काम सुरु आहे. त्यात सोयाबीन महत्वाचे आहे. अनेक शेतकऱयांनी शेतातच सोयाबीनच्या बनिम रचून ठेवले आहे. या अतिवृष्टीमुळे त्याला मात्र फटका बसला आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

चोवीस तासात पडला शंभर मिलीमिटरपेक्षा अधिक पाऊस

जिल्ह्यातील दहा महसूल मंडळात चोवीस तासात शंभर मिलीमिटर पेक्षा अधिक पाऊस पडला. त्यात लामजना १०५, किल्लारी १०७.८, निलंगा १२५, कासारबालकुंदा १४५.३, अंबुलगा १२४.८, मदनसुरी १०७.८, कासारशिरसी १२४.५, हलगरा ११४.३, भूतमुगळी १२२.३ वलांडी मंडळात १०१.८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excessive rainfall in 35 circles latur news