Latur Drought Trigger List : सोशल मीडियावरील दुष्काळ ट्रिगरच्या यादीने संताप जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांचे विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Fake Drought Trigger List Goes Viral on Social Media : जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी ही यादी बनावट असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
Latur Drought Trigger List

Latur Drought Trigger List

esakal

Updated on

लातूर : जिल्ह्यात या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींपासून ते शेतकऱ्यांपर्यंत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. शेतकरी दुष्काळात होरपळून गेला आहे. पाणीटंचाईचे सावट असताना सोशल मीडियावर दुष्काळाचा ट्रिगरच्या १४० तालुक्यांची यादी जाहीर सर्वत्र व्हायरल होत आहे.

या यादीत जिल्ह्यातील दहांपैकी एकाही तालुक्याचे नाव नसल्याने ती यादी पाहून लातूरकरांनी संताप व्यक्त केला. याबाबात शासन, प्रशासनाच्या निषेधाच्या पोस्टही फिरू लागल्या. अनेकांनी प्रशासन, कृषी विभागाकडेही या यादीच्या संदर्भात विचारणा केली. सोशल मीडियावर दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’बाबत एक यादी व्हायरल होत आहे. सदर यादी पूर्णपणे बनावट आहे.

Latur Drought Trigger List
Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सोशल मीडियावरील दुष्काळाचा ट्रिगर एक यादी ही बनावट असून त्यावर अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. शासन किंवा प्रशासनाच्यावतीने कोणत्याही दुष्काळ किंवा तत्सम उपाययोजनांची घोषणा करताना अधिकृत शासकीय पत्र, परिपत्रकाद्वारे माहिती दिली जाते.

नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी कोणत्याही अनधिकृत, फेरफार केलेल्या किंवा सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या याद्यांवर विश्वास ठेवू नये, कोणतीही खात्री न करता ही खोटी माहिती पुढे पाठवू नये. कोणत्याही अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com