Latur News: लातुरात प्रिस्क्रिप्शनशिवाय गुंगीचे औषध विकले! मेडिकल दुकानावर पोलिसांची कारवाई; नशेसाठी होत होता वापर
Medical Shop Raid: लातूरमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय गुंगीकारक औषधांची विक्री; वारद मेडिकलवर पोलिसांची छापा टाकून कारवाई. त्रामाडॉलसारखी धोकादायक औषधे विनाप्रिस्क्रिप्शन विकली जात असल्याचे उघड; शहरात मोहीम सुरू.
लातूर : जीवितास धोका करणारे गुंगीकारक औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकणाऱ्या येथील गांधी चौकातील वारद मेडिकल दुकानावर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गु्हा नोंद करण्यात आला आहे.