Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Latur Earthquake, 33 Years, Seismic Research. ३० सप्टेंबर १९९३ च्या लातूर-धाराशिव भूकंपाला ३३ वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या ३३ वर्षांत लातूर परिसरात १५० पेक्षा अधिक भूकंपाचे धक्के जाणवल्याचे नमूद असून, या हालचालींच्या शास्त्रीय संशोधनाची गरज व्यक्त होत आहे.
Earthquake, 33 Years, Seismic Research.

Earthquake, 33 Years, Seismic Research.

esakal

Updated on: 

लातूर, :लातूर व धाराशिव जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या ३० सप्टेंबर १९९३ च्या विनाशकारी भूकंपाला बुधवारी (ता. ३०) ३३ वर्षे पूर्ण होत आहेत. या भूकंपाने दोन्ही जिल्ह्यांतील ५२ गावे जमीनदोस्त झाली होती. मोठ्या प्रमाणात जीवित, वित्तहानी झाली होती. या घटनेला तीन दशकांहून अधिक काळ उलटला असला तरी भूकंपाचे धक्के मात्र आजही अधूनमधून जाणवत आहेत. संशोधनाचा मात्र अभाव आहे. भूकंपाचा धक्का बसला तर स्थानिक पातळीवर काहीच माहिती मिळत नाही. येथील भूकंपमापक केंद्राला दिल्लीहून माहिती येण्याची प्रतीक्षा करावी लागते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com