
Latur Earthquake update
Esakal
लातूर जिल्ह्यातील मुरुड अकोला परिसरात मंगळवारी (ता. २३ सप्टेंबर २०२५) रात्री ८:१३ वाजता २.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने केली. या भूकंपाचे केंद्रबिंदू लातूर शहराच्या पश्चिमेला मुरुड अकोला परिसरात होते, आणि त्याची खोली ५ किलोमीटर होती. दुसऱ्या दिवशी, म्हणजे २४ सप्टेंबर रोजी रात्री ९:२५ च्या सुमारास पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.