Latur : जिल्ह्यात यंदा अठराशे गणेश मंडळाची स्थापना होण्याची शक्यता

गणेश विसर्जन व ईद - ए - मिलाद एकाच दिवशी; शांतता कमिटीच्या बैठकीच विविध विषयांवर चर्चा
latur news
latur news sakal

लातूर - यंदाच्या गणेशोत्सवात जिल्ह्यात एक हजार ८०० गणेश मंडळाची स्थापना होण्याची शक्यता आहे. गणेशविसर्जन व ईद - ए - मिलाद एकाच दिवशी येण्याची शक्यता असल्याने प्रशासन आतापासूनच सतर्क झाले आहे.

यातूनच यंदा डीजेमुक्त गणेशोत्सव अभियान राबविण्यात येणार आहे असून गणेश विसर्जन व ईद - ए - मिलादमध्येही डीजे वापरण्यास परवानगी देण्यात येणार नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे व सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

श्री. मुंडे म्हणाले, येत्या काळात गणेशोत्सव व ईद - ए -मिलाद हे महत्त्वाचे सण साजरे होणार असून दोन्ही सण उत्साही वातावरणात व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिस दल पूर्णपणे सज्ज आहे. पोलिस ठाणे पातळीवर शांतता व मोहल्ला कमिटीच्या बैठका घेण्यात येत आहेत.

latur news
ISRO Scientist Death : चांद्रयान-३ प्रक्षेपणावेळी काऊंटडाऊनमागचा 'तो' प्रसिद्ध आवाज हरपला; इस्त्रो शास्त्रज्ञाचे निधन

या काळात जिल्ह्यातील नागरिक शांतता व सामाजिक सलोखा राखणार असल्याचा विश्वास असून सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण करणारे स्टेट्‌स, व्हिडिओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, एसएमएसवर सायबर पोलिस टीम तंत्रज्ञान करडी नजर ठेवण्यात येणार आहे. यासाठी लातूर सोशल मीडिया वॉचर्स ही व्यवस्था प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.

latur news
NASA : जळगाव सुप्याच्या वैष्णवी खोमणे हीची नासाच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड

या वेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सिद्रामप्पा पोपडे, लक्ष्मीकांत बाहेती, अनंतराव राचट्टे, मंगेश पाटील, सुनील काळे, योगेश गवळी, आसिफ बागवान, उमरदराज खान, मंगेश पाटील, नितीन जानकर, मन्सूर खान व नागरिक उपस्थित होते.

latur news
Latur News : जिल्हा रुग्णालयाच्या जमिनीसह उजनीतून पाण्याची आशा

बैठकीतील महत्त्वाच्या घडामोडी

गणेश मंडळ पदाधिकारी व ईद - ए - मिलाद कमिटीकडून शांततेची हमी

महावितरणकडून लोंबकळणाऱ्या वीज तारांबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश

गणेश विसर्जन रस्त्याची तातडीने दुरुस्ती व स्वच्छता

रस्त्यावर स्टेज अथवा पेन्डॉल बनवू नये. गुलाल वापरण्यात येऊ नये

गणेश विसर्जनासाठी विविध ठिकाणी पॉइंट

अधिकृत वीज जोडणी असेल तर गणेश मंडळांना परवाने

मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात येणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com