Latur Flood Relief: बहुभूधारकांना सोडले वाऱ्यावर; शासनाच्या आदेशात उल्लेख नाही; रोजगार हमीच्या निकषात बसतच नाहीत
Latur Floods and Heavy Rain Damage: लातूरमध्ये अतिवृष्टी व पूरग्रस्त बहुभूधारक शेतकऱ्यांना मदत मिळणे विसरले जात असल्याचा प्रश्न; शासनाने निकष बदलून मदत देण्याची शक्यता तपासण्याची गरज.
लातूर : राज्य शासनाच्या वतीने आतापर्यंत सर्वाधिक ३१ हजार कोटींचे पॅकेज अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी जाहीर केल्याचे सातत्याने सांगितले जात असले तरी यात बहुभूधारक शेतकरी विशेषतः नदीकाठचा बहुभूधारक शेतकरी मात्र भरडला जात आहे.