

Maharashtra: लातूरमध्ये चारा लागवडीसाठी एकरी १.२१ लाखांपर्यंत मदत; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी उपक्रम
esakal
Latur fodder farming scheme 2026: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढवण्यासाठी लातूर जिल्ह्यात विशेष योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना एकरी १ लाख २१ हजार ८१५ रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःचे पशुधन असणे आवश्यक नाही. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चारा लागवड करता येणार आहे.