

long pending Ahmedpur Udgir road issue resolved in Latur district
sakal
-युवराज धोतरे
उदगीर, (जि.लातुर): अहमदपूर ते उदगीर या महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासासाठी शासनाने तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाल्याने परिसरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.