Latur Heavy Rains
esakal
लातूर : काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाने (Latur Heavy Rains) थैमान घातले आहे. हाताशी आलेले पीक वाहून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ता. २२ सप्टेंबरपर्यंत पाच लाख शेतकऱ्यांना (Farmers) अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील तीन लाख ६८ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे यामुळे नुकसान झाले आहे. अजूनही पुराचा जोर कायम असून हे नुकसान वाढण्याची शक्यता आहे.