

Latur Kalyan Expressway
sakal
लातूर : महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासात नवा मैलाचा दगड ठरणाऱ्या ‘लातूर-कल्याण जनकल्याण द्रुतगती मार्गा’ची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. या निर्णयामुळे लातूर-मुंबई हा प्रवास आता पाच तासांत पूर्ण होणार असून, लातूरसह मराठवाड्याच्या विकासाला नवी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.