Latur Harinam Saptah Donation Scam
esakal
लातूर : खंडापूर येथील अखंड हरिनाम सप्ताह व संतांच्या पादुकादर्शन सोहळ्यात कोट्यवधी रुपयांच्या देणग्या गोळा करून त्याचा हिशेब देण्यात आला नव्हता. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्यावरून भ्रष्टाचारविरोधी वारकरी संपद्राय कृती समितीने आंदोलन केले होते. अखेर तीन कोटी ६५ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुख्य आयोजक किशोर महाराज जाधव शिवणीकर यांच्यासह इतरांवर शनिवारी (ता. सहा) गुन्हा दाखल करण्यात आला.