लातूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना भाडेतत्त्वावर देणार

बाबा पाटील : किल्लारी साखर कारखान्याची विशेष साधारण सभा
Latur Killari Sugar Factory Meeting
Latur Killari Sugar Factory Meetingsakal

किल्लारी : गेल्यावर्षी कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांना काय कसरत करावी लागली आहे. हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे. हेक्‍टरी १० ते १५ हजार रुपये खर्च केला. तरीही ऊस शिल्लक राहिला. अनेकांचा उस जाग्यावर वाळून गेला. हे पाहावत नसल्याने किमान या भागातील शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप व्हावे या उदात्त हेतूने कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मांडला असल्याचे मत केशव उर्फ बाबा पाटील यांनी शनिवारी कारखान्याच्या विशेष साधारण सभेत बोलून दाखवले.

सभेच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील होते. सदस्य महादेव पाटील, रमेश हेळंबे, किशोर साठे, विनोद बाबळसुरे, शिवाजी कदम, वामन पाटील, संजय कदम व्यासपिठावर होते. पाटील म्हणाले, दुकानदारांकडून भाडे गोळा करून कर्ज भरणा केला आहे. कारखान्याचे व्हॅल्युएशन एकशे २८ कोटी आहे. राज्य सहकारी बँकेचे कर्ज २ कोटी पन्नास लाख फेडून कारखाना अवसायनातून काढून ताब्यात घेतला. आता त्यावर उस्मानाबाद व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच उस्मानाबाद जनता सहकारी बँक, एसबीआय यांचे कर्ज असल्याने बँकेचा बोजा आला आहे. कारखान्यावर आणखीन ९० कोटी रुपयांचे देणे आहेत. किल्लारी साखर कारखाना हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. जे की लिक्विडेशन मधून काढून कारखाना पुनर्जीवन केला. तो चालू करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

मंजूर ठराव

सहकारी कायद्यान्वये ९७ वी घटना दुरुस्ती झाल्यामुळे पोट नियम स्विकारणे, सभासदाचे शेअर्स ५०००/ वरून १५०००/ रुपये करणे, कारखाना भाडे तत्वावर देणे, लातूर- उमरगा हायवे लगतची खुली जागा प्लॉट पाडून भाड्याने देणे आदी विषय टाळ्या वाजवून मंजूर करण्यात आले. यावेळी समिती उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, सिद्रामप्पा घोडके, प्रा. राजे आदींनी आपले म्हणणे मांडले. प्रभारी कार्यकारी संचालक तुकारम पवार याने सर्वांचे आभार मानले. कामगारांनी पगारीची मागणी केली. त्यांना मार्ग काढून पगारी देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन पाटील यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com