
Crime News
sakal
लातूर : रिक्षात बसण्याच्या शुल्लक कारणावरून एकाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी (Latur Crime Case) एकास अटक केली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) पहाटे दीड ते अडीच वाजण्याच्या दरम्यान नवीन रेणापूर नाका येथे घडली. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस (Police) ठाण्यात अपहरण, जबरी चोरी व खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक समरसिंह साळवे यांनी दिली.