esakal | Corona Impact| कोरोनाने मोडला फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा आर्थिक कणा

बोलून बातमी शोधा

ausa farmer

फुलशेती झालेला तोटा भरून काढेल अशी आशा देशमुख कुटुंबियांना होती...

Corona Impact| कोरोनाने मोडला फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा आर्थिक कणा
sakal_logo
By
जलील पठाण

औसा (लातूर): गेल्या वर्षभरापासून बंद असलेला मंडप, डेकोरेशनचा व्यवसाय, त्यात गुंतवलेल्या रकमेचे व्याजही निघत नसल्याने उदरनिर्वाहासाठी शेतीत फुलशेतीचा प्रयोग करून जगण्याची आशा धरलेल्या औसा तालुक्यातील चिंचोली (काजळे) येथील शेतकऱ्याला कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दर घसरल्याने हातातोंडाशी आलेला घास सोडून द्यावा लागत आहे.

मंदार देशमुख असे या शेतकऱ्यांचे नाव असून त्यांनी पन्नास हजार रुपये खर्च करून जोपासलेली एक एकर ऍस्टरची (गलांडा) फुलशेती नष्ट करावी लागत आहे. लागलेली फुले तोडून जमिनीवर टाकून देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आल्याने आधीच डबघाईला आलेल्या कुटुंबाची आर्थिक कंबर कोरोनाने मोडल्याने पुढे काय? हा प्रश्न आता सतावू लागला आहे.

उमरग्यात कोविड रुग्णालयाची केंद्रिय आरोग्य पथकाकडून पाहणी, विविध उपाययोजनांच्या...

औसा तालुक्यातील चिंचोली (काजळे) येथील मदार देशमुख व्यवसायाने मंडप व्यावसायिक म्हणून औसा तालुक्याला परिचित आहेत. मात्र गेल्या मार्चपासून कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय बंद पडला. लाखोंवर गुंतवणूक केलेला व्यवसाय बंद पडल्याने श्री. देशमुख हतबल झाले. त्यांची दोन मुलेही याच व्यवसायात असल्याने मोठी आर्थिक अडचण या कुटुंबापुढे उभी होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी शेतात एक एकर क्षेत्रावर गलांडा या फुलांची लागवड केली. त्याला ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून झाडे जोमदार आणली.

फुलशेती झालेला तोटा भरून काढेल अशी आशा देशमुख कुटुंबियांना होती. पण ऐन फुले बहरून येण्याच्या वेळेत कोरोनाने पुन्हा थैमान घातले. परिणामी फुल बाजार बंद झाले. लग्न आणि इतर कार्यक्रम बंद झाल्याने फुलांची तोडणी पण परवडणारी नव्हती. काबाड कष्ट करून फुलवलेली फुल शेती आणि त्यात ओतलेला पैसा देशमुख कुटुंबाची झोप उडवीनारा होता. कांही दिवस बाजार उघडेल आणि होईल व्यवस्थित सर्व या आशेवर कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने पाणी फेरले. शेवटी काळजावर दगड ठेवत मदार देशमुख आणि त्यांच्या मुलांनी लागलेली फुले तोडून जमिनीवर टाकली तर बरीच झाडे त्यांनी उपटून टाकली. 

साहेब ! वेळेचा निर्बंध लावा परंतु लाॅकडाउन नको; व्यापाऱ्यांचे उपजिल्हाधिकारी...

प्रथम मंडप व्यवसाय बंद पडला त्यात झालेला तोटा फुलशेती भरून काढेल असे वाटत असताना फुलांचे मार्केट बंद झाले त्यामुळे फुले तोडून आणि झाडे उपटून टाकावी लागत आहेत. मंडप व्यवसाय आणि शेती हीच माझ्या कुटुंबाची जगण्याची शिदोरी आहे आता पुढे काय? हा प्रश्न झोपू देत नाही. माझ्यासारख्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा व व्यावसायिकाचा शासनाने जरूर विचार करावा".

-मंदार देशमुख चिंचोली (काजळे)

(edited by- pramod sarawale)