आठवड्यातील एक दिवस गाडी न वापरता कर्मचारी येणार महाविद्यालयात

विवेक पोतदार
Wednesday, 10 February 2021

केंद्रे महाविद्यालयाचा निर्धार. पर्यावरण रक्षणाकरिता  महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम..

जळकोट,(जि.लातूर): शहरातील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयाने पर्यावरण संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलत एक नवा उपक्रम सुरु केला आहे. त्यानुसार महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी हे प्रत्येक मंगळवारी आपली मोटारसायकल अथवा चारचाकी न वापरता सायकलने अथवा बाहेरगावाहून येणारे आवश्यकतेनुसार एस.टी. बसचा आधार घेत महाविद्यालयात येतील. या स्तुत्य उपक्रमाची मंगळवारी (ता.९)  सुरवात करण्यात आली.

शासनाच्या पर्यावरण विभाग व स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने माझी वसुंधरा २०२१ कार्यक्रमाअंतर्गत प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने एक भाग म्हणून या महाविद्यायातील प्राचार्य, प्राध्यापक  व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आठवडयातून एक दिवस आपली दुचाकी व चार चाकी या वाहनांचा वापर करु नये . आवश्यकतेनुसार सार्वजनिक बस अथवा सायकलचा वापर करता येईल. असे निश्चित केले आहे. त्याची अमलंबजावणी सुद्धा सुरु झाली असून ,  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , अधिकारी, कर्मचारी सकाळी  आप- आपल्या सायकलने तर बाहेर गावाहून येणार्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा आधार घेत महाविद्यालयात येऊन मोहिमेची अंमलबजावणी केली.

शेतात पाणी देताना विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, कुटुंबावर कोसळले...

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून लागू केले असून पंचतत्वावर आधारित शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्याकरिता हे अभिनव अभियान महाविद्यालयात सुरु केले आहे. प्रदुषणा पासून निसर्गाचा होणारा न्हास टाळण्यासाठी आपलाही थोडा सहभाग राहावा म्हणून दर मंगळवारी महाविद्यालयाचे कर्मचार्यांनी सायकलने कार्यालयात यावे असा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने  घेतला.

 याप्रसंगी प्राचार्य डाॅ.बी.टी.लहाने, प्रा. डॉ. नामदेव राठोड,प्रा.रा.ना.पस्तापुरे , प्रा.पी.एस. कांबळे प्रा.जगदीश जायेवार ,प्रा.डॉ . जे.पी.शेळके .,
प्रा.डॉ. बालाजी राठोड, प्रा डॉ.एन.पी. कुडकेकर ,प्रा.डॉ. माधव कांबळे प्रा. डॉ.टी.ई.केंद्रे,, प्रा.डॉ. ए.जी.जोशी यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार निवडणूक, लोहारा नगरपंचायतीसाठी बैठक

एक दिवस गाडीविना

पर्यावरण रक्षणासाठी आठवड्यातील एक दिवस विना वाहन दिवस हा उपक्रम असून प्रत्येक मंगळवारी महाविद्यालयातील कर्मचार्यांनी स्वतः चे दुचाकी(मोटारसायकल)  अथवा चारचाकी वाहन आणू नये.असा निर्णय आम्ही घेतला आहे.  तसेच महाविद्यालयीन  कर्मचार्यांनी किमान पाच लोकांना पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून या अभियानाची व्याप्ती वाढवावी. असा हा उपक्रम आहे.- डॉ. बी. टी. लहाने  (प्राचार्य)
 

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur latest news Employees will come college one day week without using the car or bike