अतिवृष्टी बाधित बत्तीस गावांना दुसऱ्या टप्प्यातील चौदा कोटींचे वाटप

युवराज धोतरे
Friday, 22 January 2021

दुष्काळी अनुदानाचा पहिला टप्पा दिवाळीमध्ये तालुक्यातील एकूण गावापैकी जवळपास ६६ गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आला होता.

उदगीर (जि.लातूर) : जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित चौतीस गावच्या शेतकऱ्यांना चौदा कोटींचे अतिवृष्टी अनुदान जिल्हा कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. या गावच्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली आहे. या दुष्काळी अनुदानाचा पहिला टप्पा दिवाळीमध्ये तालुक्यातील एकूण गावापैकी जवळपास ६६ गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आला होता.

जिल्हा कार्यालयाकडून अनुदान कमी प्रमाणात प्राप्त झाल्यामुळे काही गावांना अनुदान मिळू शकले नव्हते. राहिलेल्या गावांसाठीचा निधी प्राप्त झाला असून तो निधी तातडीने शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर वर्ग करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गावनिहाय प्राप्त झालेल्या निधीची माहिती खालीलप्रमाणे, मादलापुर (१२२८४००), माळेवाडी (१४७००००), मुत्तलगाव (८६८०००), मोघा (६४७०४००), मोर्तळवाडी (१८५३५००), येनकी (४१४५००), रावणगाव (७३६३९००), रुद्रवाडी (७५०५००), लिंबगाव (२८०१०००), लोणी (३०५५१००), लोहारा (१११३६८००), वंजारवाडी (६४६०००), वागदरी (२३७२९९७), वाढवणा (खू) (६३९१३००), वाढवणा (बु) (६७१८२००), वायगाव (६४२६५००), शंभू उमरगा (५९८६७००), शिरोळ (३२७५६००), शेकापुर (४४१७९००), शेल्हाळ (५१८४२००), सताळा (५७८१५००), सुकणी (१९९२५००), सुमठाणा (२३६०३००), सोमनाथपूर (११८००००), सोमलातांडा (११५३५००), हंगरगा (३७५०४००), हंडरगुळी (३५३७५००), हकनकवाडी (२७०३०००), हनमंतवाडी (३६२७४००), होनी हिप्परगा (३४३८६००), हाळी (४७६१५००), हिप्परगा (२२२०९९७), हेर (१७९२३१००), हैबतपुर (२९३७४००) असे एकूण १३ कोटी ९८ लाख ८८१९४ रुपय थेट बँक खात्यावर वर्ग करण्यात येत असल्याचे श्री गोरे यांनी सांगितले.ज्या शेतकऱ्याने खाते नंबर दिले नाही किंवा खाते नंबर मध्ये काही चूक झाल्याच्या कारणाने त्या खातेदाराच्या खात्यावर रक्कम वर्ग झाली नसेल आशा खातेदारांना ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर रक्कम टाकण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

 

Edited : Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Latest News Heavy Rain Hit Villages Get Second Round Aid