Latur Minor Abuse Case : ‘कुंडली दोष’ दूर करण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय मुलीवर अत्याचार लातूरमध्ये भोंदूबाबाला पोलिस कोठडी

Latur Police Arrest Man in POCSO Case : लातूरमध्ये कुंडलीतील दोष दूर करण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी रामेश्वर रामदासी याला अटक करण्यात आली.
Latur Minor Abuse Case

Latur Minor Abuse Case

esakal

Updated on: 

लातूर : कुंडलीतील दोष दूर करण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती झाली. या अत्याचारप्रकरणी विवेकानंद चौक पोलिसांनी भोंदूबाबा रामेश्वर हनुमंतराव रामदासी (वय ४५) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध पोक्सो, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाने गुरुवारी (ता. २४) त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. लातूर शहरातील १७ वर्षीय मुलीचे पालक काही महिन्यांपूर्वी तिची पत्रिका दाखविण्यासाठी रामदासीकडे गेले होते. त्यावेळी कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी संबंध ठेवणे हा उपाय असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर मुलीच्या घरी जाऊन पूजा मांडली.

Latur Minor Abuse Case
जिम बंद केलं, आठवड्यात साहित्य विकायचं होतं, दगडूशेठ मदतीला धावला... 'कृष्णाईच्या लेकी' अभिनेत्याने सांगितला अनुभव

या दरम्यान त्याने मुलीवर अत्याचार केला. त्यातून ती गरोदर राहिली. डॉक्टरांमुळे प्रकार उघडकीस त्रास होत असल्याने मुलगी शासकीय रुग्णालयात गेली. तपासणीदरम्यान ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांना माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी रुग्णालयात भेट दिली. पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, निरीक्षक पवार यांनीही रुग्णालयात जाऊन चौकशी केली.

पूजा करताना अटक रामेश्वर रामदासी हा सम्राट चौकातील एका सार्वजनिक मंडळात गणेशाची पूजा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार यशपाल कांबळे, गणेश यादव, रणवीर देशमुख, योगेश गायकवाड, रवी गोंदकर, सचिन राठोड आणि खुर्रम काझी या पोलिस कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला विवेकानंद चौकात गणेशाची पूजा करण्यासाठी सोबत येण्यास सांगण्यात आले. पूजा करण्यासाठी ११ हजार रुपये देण्याची मागणी त्याने केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात आणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com