

rohit parshuram
esakal
आज सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा आपला निरोप घेणार आहेत. त्यांच्या विसर्जनाला सगळ्यांचे डोळे पाणावणार आहेत. त्यानंतर वर्षभर भक्त त्यांची चातकासारखी वाट पाहत राहणार. गणपती बाप्पा अनेकांची संकट दुर करतो त्यामुळेच त्याला विघ्नहर्ता म्हणतात. असाच अनुभव झी मराठीच्या लोकप्रिय नायकाला देखील आला. हा नायक म्हणजे 'कृष्णाईच्या लेकी' मालिकेतील रोहित परशुराम. 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या रोहितने त्याला आलेला अनुभव सांगितलाय.