कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लातूरच्या खासदारांनी दिला एक कोटीचा निधी

MP Sudhakar Shrungare News
MP Sudhakar Shrungare News

वडवळ नागनाथ (जि.लातूर) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी तसेच आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भाजपच्या खासदारांची एक समिती स्थापित करुन त्यांच्याकडून एक कोटी रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा आदर करीत खासदार सुधाकर शृंगारे यांनी आपत्कालीन स्थिती पाहता कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी एक कोटी रुपयांचा निधी पत्राद्वारे त्यांच्याकडे सुपुर्द केला आहे.
श्री.शृंगारे यांनी त्यांचे एक महिन्याचे एक लाख रूपयांचे वेतनही पंतप्रधान साहाय्यता निधीसाठी जमा केला आहे.

कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याच्या प्रतिबंधासाठी देशातून मदतीचा ओघ वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी श्री.शृंगारे यांनी खासदार निधीतील एक कोटी रुपयाचा निधी दिला आहे. कोरोनाच्या थैमानाने जगभर मृत्यूचे तांडव निर्माण केले असून, देशातही कोरोना दिवसेंदिवस पाय पसरत आहे. सद्यःस्थितीत देशात नऊशेपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार तसेच देशाची आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे. देशात आणि राज्यात अनेक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. परंतु जिल्ह्यात अद्यापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी आणि त्याचा संभाव्य धोका परतवून लावण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. कोरोनाविरोधी लढ्यात खासदारांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आवश्यक औषधी, यंत्रसामुग्रीची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपयाचा निधी आणि आपले एक महिन्याचे वेतन एक लाख रुपये पंतप्रधान साहाय्यता निधीसाठी दिले आहे.


कोरोना विरोधी लढ्यात प्रशासनाला नागरिकांनी मदत करावी. आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन आपल्यासाठी दिवस रात्र झटत असून, आपणही त्यांना सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. मी दररोज जिल्ह्यातील परिस्थितीचा आढाव घेत असून, नागरिकांना कसलीही अडचण आली तर आपल्या कार्यालयाशी त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.
- सुधाकर शृंगारे, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com